आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन:तिप्पण्णा इंगळे यांच्या ‘आठवणीच्या झुडुपातील काजवे’चे शनिवारी प्रकाशन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लेखक तिप्पण्णा परशुराम इंगळे यांच्या ‘आठवणीच्या झुडुपातील काजवे’ या आत्मचरित्राचे प्रकाशन शनिवार दि. ४ रोजी सकाळी १० वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हाेणार आहे.

निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू इरेश स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. विलास बेत, प्रकाशक बाबूराव मैंदर्गीकर, तर वक्ते म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. अर्जुन व्हटकर उपस्थित राहणार आहेत. श्री. तिप्पण्णा इंगळे यांच्या संघर्षमय जीवनाची वाटचाल या पुस्तकात लिहिली गेली आहे. श्री. इंगळे हे रेल्वे विभागाच्या अधिकारी पदाच्या सेवेतून निवृत्त झाले आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...