आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नूतनीकरण:सावरकर जलतरण तलाव, तळाची खोली वाढवू नका

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदिरा गांधी स्टेडियमजवळ चार पुतळ्याच्या मागील बाजूस असलेले सावरकर तलावाचे नूतनीकरण सुरू आहे. तलावाची खोली चार फुट ठेवण्याच्या मागणीचे निवेदन माजी नगरसेविका रोहिणी तडवळकरांसह महिलांनी आयुक्तांना दिले. तलावातील जुने संच काढून नव्याने बसवण्यात येत आहे. तलावातील एका बाजूची खाेली यापूर्वी चार फूट असल्याने पाण्यातून चालण्याचे व्यायाम करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक येत होते. आता तलावातील एका बाजूची खोली सहा फूट करण्यात येत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे. त्यामुळे चार फूट खाेली ठेवावी. पुढील दाेन महिन्यांत उन्हाळा सुरू होत असून, परीक्षा संपल्यानंतर शहरातील तलावात पोहण्यासाठी जलतरणपटूची गर्दी होते.तलाव बंद असल्याने हौशी जलतरणपटूंची गैरसोय होत आहे. तरी नूतनीकरण लवकरण पूर्ण करावे. तसेच तलावाची खोली सहा फुट अडचण येणार असून ती चार फुट ठेवावी असे निवेदनात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...