आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ‎:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ‎ पीएच.डी.साठी घेणार रविवारी पेट‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ६‎ नोव्हेंबर रोजी पेट अर्थात पीएच.डी. प्रवेश‎ परीक्षा आयोजिली आहे. या परीक्षेचा निकाल‎ १० नोव्हेंबर निकाल जाहीर होईल. जवळपास‎ ३८०० जागांसाठी ही परीक्षा घेतली जाणार‎ आहे.‎ दरवर्षी साधारण दहा हजारांहून अधिक‎ विद्यार्थी प्रवेश परीक्षा देतात. त्यापैकी तीन‎ हजार विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी प्रवेश‎ मिळतो. यंदा प्रवेश क्षमता वाढल्याने या‎ अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची‎ संख्या अधिक असेल. १२ हजारांहून अधिक‎ विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत.

विद्यापीठ‎ विभाग, संलग्न महाविद्यालय आणि संशोधन‎ केंद्रांमध्ये पीएच.डी.ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या‎ विद्यार्थ्यांच्या प्रवेश परीक्षेची हॉलतिकिटे‎ उपलब्ध झाली आहेत.‎ फुले पुणे विद्यापीठाच्या‎ वेबसाइटवरील प्रत्येक विद्यार्थ्याच्या लॉगिनवर‎ हे हॉलतिकीट उपलब्ध केल्याचे‎ विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. यंदा‎ अनेक नवीन मार्गदर्शकांनाही मान्यता देण्यात‎ आली आहे. त्यामुळे पीएच.डी.‎ अभ्यासक्रमासाठी तुलनेत यावेळी अधिक‎ संख्येने विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता‎ आहे. या प्रवेशासाठी विद्यापीठाद्वारे घेण्यात‎ येणाऱ्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तयारी‎ सुरू केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...