आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:सोमवारपासून शाळा, प्रवेशोत्सव बुधवारी ; सर्व शिक्षक व कर्मचारी राहणार उपस्थित

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व माध्यमांच्या शाळा सोमवार, दि. १३ जूनपासून सुरू होणार असून त्या दिवशी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित राहतील. प्रत्यक्षात बुधवार दि. १५ जूनपासून शाळेच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात होईल, त्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा होईल. मुलांना शैक्षणिक साहित्य, गणवेशही पहिल्या दिवशी देण्यात येणार आहे. १३ व १४ जून रोजी शाळेची स्वच्छता, कोविडच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीची तयारी करण्याचा आदेश शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी काढला आहे. शाळा सुुरू करण्यासंदर्भात बऱ्याच शिक्षक ,मुख्याध्यापकांमध्ये संभ्रम होता. तो या निर्णयाने दूर झाला आहे. मनपा शिक्षण मंडळाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा स्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत. मनपा शिक्षण मंडळ पहिली ते आठवीच्या एकूण ५८ शाळा आहेत. त्या शाळांमधील एकूण ३९१५ मुला मुलींना गणवेश दिला जाणार आहे. त्यामध्ये २७०१ मुली, एससी ७८० मुलं, एसटी ५५ मुलं, ३७९ बीपीएल मुलं एकूण २३ लाख ४७ हजारांचा निधी शाळा स्तरावर पाठवण्यात आलेला आहे. मुलांना वेळेत पुस्तके मिळावीत यासाठी ८५ टक्के पुस्तके शाळांमध्ये पोहोच झाली आहेत. बालभारतीकडून शंभर टक्के पुस्तके प्राप्त झालेली आहेत.तसेच शाळा स्तरावरील रंगरंगोटी, दुरुस्तीची कामे पूर्णत्वास आली आहेत.

बातम्या आणखी आहेत...