आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय साहित्य:चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते अमोगसिध्द प्रशाला, कै.आशय्या ईरय्या अरकल मराठी विद्यालय, जय भारत प्राथमिक शाळा यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

यावेळी तहसीलदार अमरदीप वाकडे, नगर प्रशासनाचे सहायक आयुक्त एन. के. पाटील, चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष शंतनु गायकवाड, अशोक इंदापुरे , रघुनाथ बनसोडे, चंद्रकांत चलवादी, देविदास शिंदे, प्रशांत भांडे, शंकर जाधव, अनिल पवार, अनिल कोकाटे, यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. संघटनेतर्फे राबवित असलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमासाठी आम्हीदेखील सहकार्य करू. तसेच, विद्यार्थ्यांनीसुध्दा या उपक्रमाचा लाभ घेऊन शिक्षण घ्यावे व जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी वाघमारे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...