आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंचायत समिती, दक्षिण सोलापूर व ग्लोबल व्हिलेज पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 50 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी होते. व्यासपीठावर पद्माकरराव हराळकर, संगीत शहा- चनशेट्टी, विनायकराव माने, विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे, गुरुबाळ सनके, जयश्री सुतार उपस्थित होते. प्रदर्शनात प्राथमिक गटात 52 तर माध्यमिक गटात 59 असे एकूण 11 प्रयोगांची मांडणी करण्यात आली होती.
भारताचा सन्मान विज्ञान आणि तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीच्या जोरावर अख्खं जग करीत आहे. विज्ञान हे भारतास लाभलेले एक वरदान आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया परिपूर्ण बांधण्याचे काम शास्त्रज्ञ करीत आहेत. करोडो रुपये खर्च करून तयार केलेले उपग्रह अमेरिका, फ्रान्स व जर्मनी सारखे देश भारतातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने पाठवतात. जगात भारत हा एकच असा देश आहे ज्याने ५७७ इतर देशांचे उपग्रह वर पोहोचवले व स्थापित केलेत. स्पर्धक विद्यार्थ्यांनी विज्ञान व्यवस्थितपणे समजून घेतले तर तुम्हीही दैदिप्यमान कामगिरी करू शकाल असा विश्वास डॉ. व्यंकटेश गंभीर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी म्हणाले कि, शिक्षणातूनच बदल शक्य असून गुरुजी हा गुण रुजवणारा जीवात्मा आहे. शिक्षकांनी मनावर घेतले तर प्रत्येक विद्यार्थी उद्याचा उज्वल भारत घडवेल. शिक्षकांनी प्रयोगशाळा नाही असे म्हणत बसण्यापेक्षा "विना प्रयोगशाळा प्रयोग" अशा माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रियाशीलता निर्माण करावी, असेही त्यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना उद्देशून सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.