आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Scissoring Surgery In Upazila, Rural Hospital Solapur | Women Benefit Immediate Access Facilities | Surgery For The First Time In 10 Years At Shetphal Rural Hospita

रुग्णांना मिळणार लाभ:10 वर्षात पहिल्यांदाच शेटफळ ग्रामीण रुग्णालयात सिंझरींग शस्त्रक्रिया; डाॅ.प्रदीप ढेलेंची माहिती

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविडच्या काळात शासकीय दवाखान्यांमध्ये सोई-सुविधा निर्माण केल्याने जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयेही अद्यावत झाली आहेत. जिल्ह्यातील 17 आरोग्य संस्थामध्ये सिझरींगच्या शस्त्रक्रिया होत असल्याने गरजू महिला रुग्णांना लाभ मिळत आहे. पूर्वी फक्त 3 उपजिल्हा व 4 ग्रामीण रुग्णालयामध्ये सिझरींगच्या शस्त्रक्रिया होत होत्या. मात्र कोविडनंतर सिव्हिल सर्जन कार्यालयाकडून सर्वच ठिकाणी शस्त्रक्रिया सुरू केल्या आहेत. अशी माहिती डाॅ.प्रदीप ढेले यांनी दिली.

सोलापूर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यायलाकडे 3 तीन उपजिल्हा रुग्णालय व 14 ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. कोविडच्या अगोदर तीन उपजिल्हा रुग्णालय व अक्कलकोट, बार्शी, सांगोला व मंगळवेढा या ठिकाणी गरजेनुसार व रुग्णाच्या स्थितीनुसार सिझर केले जात हाेते. मात्र शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करीत सिव्हिल सर्जन कार्यालयाने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यावर भर दिला.

गरजूंना तात्काळ उपचार

आठ वर्षापासून शेटफळ ग्रामीण रुग्णालय कार्यरत आहे, या ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसापूर्वी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक ठिकाणी तज्ञ डॉक्टरांची टीमही कार्यरत केली असल्याने गरजूंना तात्काळ उपचार मिळण्यास मदत होत आहे.

सिझर करण्यासाठी पसंती

जिल्हा शल्यचिकित्यक कार्यालयाकडून अति जोखमीच्या व गरोदर मातांचा सर्वे केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील एकूण 2674 महिलांचा समावेश आहे. त्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रात 5.8 टक्के, ग्रामीण रुग्णालय 20.2 टक्के, उपजिल्हा 17.6 टक्के तर सिव्हिलमध्ये 14.7 व खासगीमध्ये 37.2 टक्के महिलांनी उपचार करण्यासाठी पसंती दर्शवली आहे.

सन- प्रसुती खासगी शासकीय प्रसुती सिझर

2019-20 73628 46457 27171 5788

2020-21 77184 51783 25401 5271

2021-22 75413 49629 25784 5925

2022-23 16324 10109 6215 1439

बातम्या आणखी आहेत...