आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाची घोषणा:माझी वसुंधरा मध्ये दुसरे; मंद्रूपला 1 कोटीचे बक्षीस

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर तालुक्यांतील मंद्रूप ग्रामपंचायतीस माझी वसुंधरा योजनेअंतर्गत १ कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत प्रथम आले, तर मंद्रूप ग्रामपंचायत राज्यात द्वितीय आली.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने बक्षिसे जाहीर केली. जिल्ह्यात प्रथमच एक कोटी रुपये बक्षीस मिळविणारी मंद्रुप ग्रामपंचायत पहिली ठरली आहे. मंद्रूप ग्रामपंचायतीने मोठे प्रयत्न करून विशेष कामगिरी केली आहे.

मंद्रूपकरांनी हे केले
मंद्रूप ग्रामपंचायतीने गावामध्ये स्थानिक प्रजातीच्या झाडांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली. धुळवडीच्या निमित्ताने गावातील आम्ही मंद्रूपकर व रानवेध फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. तेथील राख झाडांना घातली, तिरडीच्या बांबूंपासून झाडांना आच्छादन करण्यात आले.

त्याच ठिकाणी पक्ष्यांसाठी पाणपोई तयार करण्यात आली. तसेच पक्षिधाम साकारले. सौर ऊर्जेचा वापर, बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचा वापरास प्रोत्साहन, वृक्ष गणना, हेरिटेज वृक्ष नोंदीसह कौटुंबिक कार्यक्रमात स्थानिक प्रजातीच्या झाडांची रोपे भेट देण्याची संकल्पना राबवली.

बातम्या आणखी आहेत...