आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिकंदराबाद-मुंबई मालगाडी रुळावरून घसरली:जीवितहानी नाही, ट्रॅकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिकंदराबादहून मुंबईकडे निघालेल्या करमाळ्याच्या केम जवळ सिमेंट वाहून नेणारी सिकंदराबाद मुंबई मालगाडी पहाटे 2 वाजता यार्डात साईडीगला घेताना रुळावरून घसरल्याची घटना सोलापूर विभागात घडली आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. ट्रॅकचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

याबाबतचे अधिक माहिती अशी की, नेहमी दक्षिणेतून मुंबईच्या दिशेला सिमेंट वाहतूक करणारी सिकंदराबाद मुंबई मालगाडी ही रात्री करमाळ्याच्या दिशेने निघाली होती पाठीमागून येणाऱ्या नांदेड पनवेल या एक्सप्रेसला क्रॉसिंगसाठी ही गाडी साईडिंगला घेणे गरजेचे होते. तेव्हा ही गाडी साईडला घेत असताना यार्डात जात असताना ही गाडी घसरली.

मदत कार्य सुरू

इंजिन आणि दोन डबे घसरले आणि मागचा एक डबा अस्थाव्यस्थ झाला. मात्र यात कोणाला काही झाले. चालकाच्या लक्षात आल्यावर प्रशासनाला खबर देणायात आली. त्यानंतर मदत पथकाच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले.

नांदेड-पनवेल एक तास उशीर

ही मालगाडी जेव्हा केमच्या यार्डात पळवण्यात येत होती तेव्हा अचानक काही घटना घडत असल्याचे व इंजिन डबे घसरल्याचे लक्षात आले. तेव्हा लगेच मागून येणाऱ्या नांदेड पनवेल या एक्सप्रेसच्या संदर्भातील यंत्रणा सतर्क करण्यात आली मात्र या सर्व प्रकारामुळे नांदेड पनवेल गाडीला एक तास उशीर झाला त्यामुळे रेल्वे वाहतुक सुरळीत होण्यासाठी एक

उशीर लागला. मात्र बाकीच्या गाड्यांचे वेळेचे नियोजन पूर्ववत करण्यात आले.

बाकीच्या गाड्या सुरळीत

सिकंदराबाद-मुंबई सिमेंट वाहतूक करणारी मालगाडी पहाटे दोन वाजता यार्डात वळवत असताना केम जवळ रेल्वे रुळावरून खाली घसरली. यात इंजिन आणि दोन डब्यांचे थोडेफार नुकसान झाले आहे. मात्र कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही या घटनेमुळे नांदेड पनवेल गाडीला एक तास उशीर झाला. मात्र यंत्रणा त्वरित काम करत पुढच्या वाहतुकीला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये यासाठी वेगाने काम करत होती. त्यानंतर केवळ एक तासात बाकीच्या सर्व गाड्या त्यांच्या वेळेनुसार नियोजित पद्धतीने सुरू झाल्या आहेत. नेमके कारण कळाले नसल्याने चौकशी सुरू आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक लक्ष्मण रणयेवले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...