आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनसह डबे थेट शेतात:सिकंदराबाद-मुंबई मालगाडीचे इंजिन, 2 डबे रुळावरून घसरले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सिकंदराबादहून मुंबईकडे निघालेली मालगाडी रविवारी पहाटे २ वाजता ‘सायडिंग’ला घेताना केम यार्डात रुळावरून घसरली. रेल्वेच्या सोलापूर विभागात हा अपघात घडला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी रेल्वे ट्रॅकचे माेठे नुकसान झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या घटनेमुळे नांदेड-पनवेल गाडीला तासभर उशीर झाला.

सिमेंट वाहतूक करणारी सिकंदराबाद-मुंबई मालगाडी करमाळ्याच्या दिशेने निघाली होती. पाठीमागून येणाऱ्या नांदेड-पनवेल या एक्स्प्रेसला क्रॉसिंगसाठी ही मालगाडी सायडिंगला यार्डात घेताना घसरली. इंजिन आणि दोन डबे रुळावरून घसरले आणि मागचा एक डबा अस्ताव्यस्त झाला. चालकाने रेल्वे कंट्राेलिंग विभागाला तातडीने माहिती दिली. मदत पथकाच्या वतीने तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. मालगाडीपाठीमागून येणाऱ्या नांदेड-पनवेल गाडीला सतर्क करण्यात अाले. रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी एक तास उशीर झाला.

जीवितहानी नाही, मात्र रेल्वे रुळांचे मोठे नुकसान केमच्या यार्डात सायडिंगला नेताना सिकंदराबाद मुंबई- मालगाडीचे इंजिन अन् दोन डबे रुळावरून घसरले.

अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध सुरू केलाय ^सिकंदराबाद-मुंबई मालगाडीला अपघात झाल्याचे लक्षात येताच यंत्रणा सतर्क केली हाेती. या मार्गावरील रेल्वे वाहतुकीला बाधा येऊ नये यासाठी वेगाने मदतकार्य सुरू केले. अपघाताचे नेमके कारण कळाले नसल्याने चौकशी सुरू केली आहे. -लक्ष्मण रणयेवले, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर विभाग

बातम्या आणखी आहेत...