आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे प्रकटीकरण शाखेेची कारवाई:कर्नाटक राज्यातून आलेला गुटखा जप्त

पंढरपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकातून आलेला आणि पुणे इथे विक्रीसाठी जाणारा १० लाख ४ हजार रुपये किमतीचा गुटखा पंढरपूर शहर पोलिसांनी पकडला आहे. यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे यांनी सांगितले, कर्नाटकातून गुटखा घेऊन एक टेम्पो सांगोला मार्गे पंढरपूर शहरातील भक्तीमार्गे पुण्याला जाणार असल्याची माहिती पोकॉ शरद कदम यांना मिळाली होती.

त्यांनी ही माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, शहर पोलिस निरीक्षक अरुण पवार यांना दिली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा लावून टेम्पाे(एमएच १२ टीव्ही ३९३६) थांबवला असता त्यामध्ये गुटखा आढळला. गुटख्याची किंमत १० लाख ४ हजार तर टेम्पोची किंमत सुमारे ७ लाख रु.असा एकूण १७ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...