आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:राज्य ऑलिम्पिक धनुर्विद्या स्पर्धेसाठी‎ जिल्ह्यातील 20  खेळाडूंची निवड‎

मोडनिंब‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक धनुर्विद्या ‎स्पर्धेसाठी जिल्ह्यातील २०‎ खेळाडूंची निवड झाली. अमरावती‎ येथे उद्यापासून स्पर्धा होणार आहेत. ‎ ‎ यासाठी निवड झालेल्या खेळाडूंचा ‎आमदार बबनराव शिंदे यांनी सत्कार ‎केला. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये‎ आठ मुले व १२ मुलींचा समावेश‎ आहे. इंडियन राऊंड मुले व मुली,‎ रिकर्व्ह राऊंड मुले व मुली, व‎ कंपाऊंड राऊंड मुली अशा पाच‎ संघाची निवड या स्पर्धेसाठी झाली‎ आहे.

‎ इंडियन प्रकारात रोशन दोरगे‎ अरण, प्रसाद भांगे शेटफळ, दिगंबर‎ चव्हाण अरण, रत्नतेज शिरसाट मोडनिंब, समृद्धी पवार अरण,‎ पायल गाजरे अरण, अश्विनी गाजरे‎ अरण, अनुराधा पाटील अरण,‎ रिकर्व्ह प्रकारात आदित्य भंडारे‎ पाटकुल, पृथ्वीराज चवरे पेनूर,‎ शिवम चिखले करमाळा, पृथ्वीराज‎ घाडगे अरण, श्रेया परदेशी‎ सोलापूर, सायली माने मोडनिंब,‎ सायमा शेख बार्शी व शेजल चव्हाण‎ पंढरपूर, कंपाउंड प्रकारात तनिष्का ठोकळ सोलापूर, प्रतीक्षा पारसे‎ परिते, गौरी डवरी शेटफळ, स्मृती‎ विरपे पाटकूल या खेळाडूंची निवड‎ झाली आहे. जिल्हा संघटनेचे‎ सचिव हरिदास रणदिवे उपस्थित‎ होते. क्रीडा मार्गदर्शक मार्गदर्शक‎ सावता घाडगे, दीपक‎ चिकणे,विठ्ठल भालेराव, सचिन‎ रणदिवे, सागर सुर्वे, मनीष‎ नाईकनवरे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...