आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:काळेगावच्या उपसरपंचपदी घायतिडक यांची निवड

वैरागएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यातील काळेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी द्रोपदी अंगद घायतिडक यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी शिवाजी कांबळे ग्रामसेवक एस. एम. पाटील यांनी द्रोपदी घायतिडक यांची बिनविरोध निवड जाहीर केली. सरपंचपद व नऊ सदस्य असलेल्या काळेगाव ग्रामपंचायतीत आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली श्री लक्ष्मी नरसिंह विकास आघाडीने सर्व जागा जिंकत सत्ता काबीज केली. या वेळी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.

सरपंच महादेव नांगरे, काळेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी द्रौपदी घायतिडक, आप्पासाहेब घायतिडक, विनायक देशमुख, नेताजी घायतिडक, अरुण घायतिडक, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश काळे, अविदा देशमुख, गंगूबाई नांगरे, विष्णू सुरवसे, बाळासाहेब घायतिडक, सुरेखा घायतिडक, गणेश काळे, मालन मस्तुद उपस्थित होते. या वेळी देविदास घायतिडक, शहाजी घायतिडक, पंडित गटकळ, भाऊसाहेब घायतिडक, सुजित घायतिडक, धनंजय काळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...