आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:वयम् येथे स्वतःला जाणून‎ घेण्याची कार्यशाळा सुरू‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎जुळे सोलापूर भागातील विवेकानंद‎ केंद्र वयम् येथे स्वत:ला जाणून‎ घेण्यासाठीची दोन दिवशीय‎ कार्यशाळा सुरू झाली आहे.‎ विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे‎ राष्ट्रीय उपाध्यक्ष हनुमंत राव यांच्या‎ हस्ते स्वानंद या कार्यशाळेचा‎ शुभारंभ झाला. सोलापूरसह पुणे,‎ लातूर येथूनही व्यावसायिक,‎ उद्योजक, सीए, नोकरदार जिज्ञासू‎ सहभागी झाले आहेत. उद्घाटन‎ प्रसंगी प्रमुख अतिथी प्र. कुलगुरू‎ डाॅ. राजेश गादेवार, संचालक दीपक‎ पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती‎ होती. खरा आनंद हे आपल्यातच‎ असतो. तो आनंद कायमस्वरूपी‎ कसा राखावा, स्वतःला कसे जाणून‎ घ्यावे, याविषयी ही कार्यशाळा‎ असल्याचे प्रो. कुलगुरू डॉ. राजेश‎ गादेवार यांनी सांगितले.

कार्यशाळेत‎ योग आणि प्राणायामचे प्रात्यक्षिक‎ झाले.‎ श्री. हनुमंत राव म्हणाले, जेव्हा‎ आपण एखादे लक्ष निर्धारित करतो,‎ तसेच मिळणाऱ्या फळाचीही व्याप्ती‎ आपणच ठरवतो. परंतु ठरल्याप्रमाणे‎ फळाची प्राप्ती न झाल्यास‎ आपल्याला ताण येतो. तेथूनच‎ आपल्यात नकारात्मक विचार‎ येण्यास सुरुवात होते. यातून बाहेर‎ पडून खरा आनंद मिळवण्यासाठी‎ ही कार्यशाळा आहे.‎

बातम्या आणखी आहेत...