आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरचे माजी नगराध्यक्ष एस. आर. देशमुख यांचे निधन:सहकार क्षेत्रातील तारा निखळला; शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप

लातूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लातूरचे माजी नगराध्यक्ष, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते एस.आर. देशमुख यांचे काल निधन झाले. त्यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संघर्षमय जीवनातून पुढे आलेले एस. आर. देशमुख हे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपले वाटायचे. राजकारणात वावरताना त्यांच्या वागण्यात कटुता नव्हती. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार तसेच गोतावळा मोठा होता.

लातूरच्या जडणघडणीत योगदान

लातूरच्या जडणघडणीत तसेच सहकार, राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रात देशमुख यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहणारे आहे. त्यांच्या अंत्यविधीस पालकमंत्री अमित देशमुख यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती.

कधीही भरून न निघणारे नुकसान

एस.आर. देशमुख हे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे खंदे समर्थक होते. आमच्या बरोबरही त्यांचा स्नेह होता. त्यामुळे एक प्रकारे ते देशमुख कुटुंबीयांचे सदस्यच होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे, अशी भावना पालकमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली. नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी होते. गणेश देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ईश्वराने शक्ती प्रदान करावी, अशी भावनाही त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...