आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:ज्येष्ठ रणजीपटू सलीम खान यांचे निधन; परिसरात शोकाकुळ

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रणजीपटू सलीम खान (वय ६२) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सोलापुरात १९९४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विरुद्ध मुंबई या रणजी सामन्याकरिता त्यांची निवड झाली होती. परंतु त्यांना संघात घेतले नव्हते म्हणून त्यावेळी सोलापूरकरांनी थेट मैदानात सामना सुरू असताना घोषणाबाजी केली होती. त्यावेळी त्यांना थोड्या वेळासाठी मैदानात उतरवले होते.

ते मुंबई येथील टाइम्स शिल्ड व कांगा लीग क्रिकेट स्पर्धेत खेळले होते. मुंबईतील क्रिकेट क्लबकडून केनिया व टांझानिया या देशाचा दौरा त्यांनी केला होता. ते एसटी महामंडळ सोलापूर विभागातून लिपिक म्हणून निवृत्त झाले होते. राज्य परिवहन क्रिकेट संघाचेही कर्णधार होते. ते उत्कृष्ट यष्टीरक्षक होते. पानगल हायस्कूल, संगमेश्वर महाविद्यालयातून आणि साऊथ सोलापूर क्लब, युनायेड क्रिकेट या क्लबकडून ते खेळत होते. नंतर त्यानी स्व:ताच्या नावाने सलीम खान अकादमी सुरू केली होती.