आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रेल्वे अधिकाऱ्याकडून बेघरांची सेवा; कार्यालयीन अधीक्षक मीणा यांचे सहा वर्षांपासून व्रत

रमेश पवार | सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगला पैसा मिळवून देणारी नोकरी मिळाली की लोक मागे वळून समाजाकडे, उपेक्षितांकडे पाहत नाहीत. आपण ज्या समाजामध्ये राहतो, वावरतो, त्या समाजाप्रती कोणीच जबाबदारी दाखवत नाही, असे सामान्यत: बोलले जाते. याला सोलापूर रेल्वे विभागातील कार्यालयीन अधीक्षक रमेशचंद्र मीणा अपवाद आहेत. त्यांनी बेघर मनोरुग्णांची सेवा करण्याचा वसा घेतला आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते सेवा करत आहेत. आजपर्यंत त्यांनी दोनशेहून अधिक जणांची सेवा केली आहे.

मूळचे राजस्थानचे असलेले मीणा सामाजिक जबाबदारी म्हणून हे समाजकार्य करत आहेत. त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात आंघोळ न केलेल्या, जखमी असलेल्या लोकांना सेवा देतात. त्याचे हे कार्य २०१६ पासून सुरू आहे. सोलापूर व दौंडमधील अनेक बेघर अस्वच्छ लोकांचे केस कापून, त्यांना आंघोळ घालून, नवीन कपडे घातले आहेत. हे काम आठवड्यातून दोन दिवस म्हणजे शनिवारी व रविवारी करतात. काहीजणांना घरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्यास ते त्यांना घरी पोहोचवतात. काहीजण जखमी आढळल्यास त्यांना सिव्हिल हॉस्पिटलसारख्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करतात. उपचार मिळवून देतात. त्यासाठी ते स्वत: तिथे जातात. या सामाजिक कार्याला रेल्वे कार्यालयातील सहकारी, अधिकारी व कर्मचारीही आर्थिक मदत करतात, असे मीणा यांनी आवर्जून सांगितले.

पुतण्याच्या मदतीने आंघोळ
असाच प्रत्यय रविवारी दुपारी १२ च्या सुमारास पार्क चौकातील रेमंड शोरुमच्या बाजूला पाहावयास मिळाला. रमेशचंद्र मीणा व त्यांचे पुतणे रिंकू एका बेघर महिलेला आंघोळ घालत होते. तत्पूर्वी त्यांनी त्या महिलेचे केस कापले व स्वच्छ पाण्याने आंघोळ घातली. नवीन कपडेही घालण्यासाठी दिले. नंतर चहाही दिला, नाश्ता करणार का? अशी विचारणा केली असता ती नको म्हणाली.

माझा स्टाफ मला मदत करतो
नागरिक स्वत:हून लोकांची सेवा करतील. इतरही प्रेरणा घेतात. आठवड्यातून दोन दिवस सेवा करतो. दौंड व पुणे येथील बेघरांची सेवा केली आहे. केस कापून, नवीन कपडे घालण्यासाठी देतात. यासाठी कार्यालयीन स्टाफ मदतीने बेघरांची सेवा करीत आहे. बेघर असतील, त्यांची सेवा करायची असल्यास ९७३०४५४५०१ वर संपर्क करावा, असे रमेशचंद्र मीणा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...