आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील काही जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आषाढी यात्रा कालावधीत आरोग्य विभागाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच कोरोना चाचणी केंद्राची स्थापना करावी तसेच संशयितास तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करावी, असे आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक (यशदा) कर्नल विश्वास सुपनेकर यांनी सांगितले.
आषाढी यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कराव्या लागणाऱ्या कामांची पूर्व तयारीचे प्रशिक्षणाबाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, नायब तहसीलदार मनोज श्रोत्री, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ तसेच संबंधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. तत्पूर्वी श्री सुपनेकर यांनी विविध ठिकाणांची भेट देऊन पाहणी केली.
भाविकांच्या सुविधेसाठी शीघ्र कृतिदलाची नियुक्ती करावी वारी कालावधीत गर्दीच्या ठिकाणी तसेच ज्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात थांबतात त्याठिकाणी भाविकांच्या सुविधेसाठी शीघ्र कृतिदलाची नियुक्ती करावी. प्रदक्षिणा मार्ग, नदी पात्र,घाट, पत्राशेड, दर्शन रांग, मदीर परिसर, तसेच ६५ एकर या ठिकाणी वेगवेगळे संभावित धोके लक्षात घेता तत्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. महावितरण कंपनीने रोहित्रांची तसेच विद्युत वाहक तार तपासणी करावी तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी पथक नेमावे, असेही यावेळी श्री. सुपनेकर यांनी सांगितले.
गर्दीच्या ठिकाणी उपाययोजना करणार
प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी प्रशासनाकडून तसेच मंदिर समितीकडून आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. तर उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी गर्दीच्या ठिकाणी संभाव्य धोके लक्षात घेता आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून तयारी करण्यात आल्याची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.