आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुराच्या पाण्यात शिरणे पडले महागात VIDEO:बार्शी तालुक्यात 7 जण गेले वाहून; दैव बलवत्तर म्हणून गावकऱ्यांनी वाचवले प्राण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यात पुराच्या पाण्यात तब्बल 7 जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या सर्वांना वाचवण्यात यश आले आहे.

राज्यातील काही भागांमध्ये पावसाने विसावा घेतला असला, तरी काही ठिकाणी पावसाचा प्रकोप बघायला मिळतोय. पावसाच्या आकांडतांडवाच्या घटना ताज्या असताना सोलापूरच्या बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नेमकी घटना काय?

बार्शी ते श्रीपत पिंपरी दरम्यान गोरवाडा येथे हा ओढा आहे. गावकऱ्यांना कायम नेहमी या ओढ्यावरील पुलावरून जीव मुठीत धरून जावे लागते. बुधवारी (28 सप्टेंबर) दुपारी 3 वाजेच्या सुमारास काही गावातील लोक पुलावरून जात होते. पण पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सात ग्रामस्थ पाण्यासोबत वाहून गेले.

तरुणांनी मारल्या उड्या

श्रीपत पिंपरीचे पप्पू क्षीरसागर, पप्पू कुंभार, दिलीप ताकभाते, अनिता ताकभाते, पोपट घाडगे, अनुसया घाडगे व निखील कुंभार हे पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होते. हे पाहून तिथे असलेल्या तरुणांनी जीवाची पर्वा न करता ताबडतोब ओढ्याच्या पात्रात उड्या मारल्या आणि वाहून जात असलेल्या सातही ग्रामस्थांना वाचविले.

बातम्या आणखी आहेत...