आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वाेच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल िदला. त्यानंतर सांगाेल्याचे अामदार अॅड. शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना तिखट शब्दांत उत्तर दिले. म्हणाले, ‘काय झाडी, काय नरहरी झिरवळ अाता झिरवळ गेला झुरळं हुडकायला...’
राऊत यांनी , ‘काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची नरहरी झिरवळ…जय महाराष्ट्र!’ असे ट्विट केले होते. या ट्विटचा अॅड. पाटील यांनी त्याच शब्दांच समाचार घेतला. पुढे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या लोकशाहीसाठी एक पथदर्शी म्हणून या निकालाकडे पाहावे लागेल.
विधिमंडळाचे कामकाज हे विधिमंडळाच्या कायद्याने चालावे आणि त्या कामकाजाचे सर्व अधिकार हे अध्यक्षांना असावेत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. देशातील सर्व विधिमंडळांना ताकद आणि शक्ती देणारा असा हा निकाल आहे.’’
जनतेची कामे करावीत
यापूर्वीच्या घडलेल्या घडामोडींबाबत विरोधी पक्ष बोलत होते. पण, अाता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना बाेलण्यास जागा नाही. महाराष्ट्राला पुढे नेणारे हे सरकार अाता अधिक जाेमाने काम करेल.''''
-विक्रम देशमुख, शहराध्यक्ष, भाजप
सर्वोच्च न्यायालयाचा मान राखणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने बरेच मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत. आलेल्या निकालामुळे शिंदे गटात आनंद आहे तर ठाकरे गट समाधानी आहे. या निकालामुळे शिंदे सरकार वाचले.''
- फारूक शाब्दी, शहराध्यक्ष, एमआयएम
सर्वाेच्च न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांच्या अक्षम्य चुका चव्हाट्यावर अाणल्या अाहेत. त्यांच्यामुळेच या राजकीय उलथापालथी झाल्या. त्याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
-शरद काेळी, उद्धव ठाकरे शिवसेनेचे गटाचे नेते
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंद झाला असेल. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जनतेची कामे करावीत अन्यथा जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.'''
-भारत जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी
न्यायालयाने स्पष्ट ताशेरे ओढत, राज्यापालांच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे हे सरकार दिशाभूल करुन सत्तेत आले आहे. मुख्यमंत्र्यांनी नैतिकता स्वीकारुन राजीनामा द्यावा. अन्यथा अागामी निवडणुकीत जनता त्यांना धडे शिकवेल. त्याचे पडसाद महापालिका निवडणुकीत दिसून येतील.
-चेतन नरोटे, काँग्रेस शहराध्यक्ष
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.