आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:शहांचे उत्तर आले; काडादींचे मात्र आले नाही

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिस्तूल दाखवून केतन शहा यांना धमकावल्याप्रकरणी सिद्धेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांना पोलिसांनी नोटीस दिली होती. तिला मंगळवारपर्यंत त्यांचे उत्तर आले नाही, अशी माहिती पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली. नोटीस देताना आठ दिवसांत उत्तर देण्याची सूचना केली होती.

दरम्यान, उद्योजक केतन शहा यांनी वकिलामार्फत सदर बझार पोलिसांच्या नोटिसाला उत्तर दिले आहे. याबाबत पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी सांगितले की, केतन शहा यांनी तीन दिवसांपूर्वी उत्तर दिले आहे. काडादी यांनी धमकावल्यानंतर त्याच दिवशी पोलिस आयुक्त यांना भेटून शहा यांनी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली होती.

या प्रकरणाची पोलिसांनी दखल घ्यावी
धर्मराज काडादी यांनी पिस्तूल दाखवत धमकावले. त्याप्रश्नी पोलिसांनी नोटीस दिली होती. त्यावर आम्ही उत्तर दिले आहे. याप्रकरणाची पोलिसांनी स्वत:हून दखल घ्यावी, असे उत्तरात स्पष्टपणे म्हटले आहे.’’-केतन शहा, सोलापूर विकास मंच

बातम्या आणखी आहेत...