आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माघार:शांती इंग्लिश मीडियम स्कूल नरमले, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुल्क भरले नसल्याने रोखले होते, प्रशासनाधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला

शैक्षणिक शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना शांती इंग्लिश स्कूलमध्ये परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे पालकांनी हरकत घेतली. त्यामुळे काही वेळ गोंधळ झाला. शुल्क नंतर भरण्याची सवलत पालकांनी मागितली. मात्र शाळेने ती दिली नाही. पालकांनी शाळेच्या गेटसमोर निषेध व्यक्त केला. दरम्यान तक्रार मिळाल्यानंतर प्रशासनाधिकारी संजय जावीर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू देण्यासाठी सांगितले. अन्यथा शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेची मान्यता काढून घेतली जाईल, असे सांगितले. त्यावर शाळेने नरमाईची भूमिका घेत सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी होकार दिला. परीक्षेपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याची हमीही शाळेने दिली.

शुल्काबाबत लेखी लिहून घेतले
शाळेचे शुल्क पालकांना द्यावेच लागणार आहे. शेवटी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शासनाकडून अनुदान मिळत नाही. मात्र आरटीईअंतर्गत नोंदणी असेल, २५ टक्केनुसार प्रवेश दिल्या असेल, त्या पाल्याची शासनाकडून फी मिळते. मात्र उर्वरित विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरावेच लागते. तरी शांती इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाकडून परीक्षेपासून वंचित ठेवलेल्या सर्व मुलांच्या पालकांना बोलवून कधी शुल्क भरणार याबाबत लेखी लिहून घेतले आहे.

परीक्षेपासून वंचित राहणार नाहीत
शांती इंग्लिश मीडियम स्कूलविषयी पालकांकडून तक्रारी आल्या. मुख्याध्यापकांना बोलावून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नका, ठेवल्यास तुमच्या शाळेची मान्यता काढून घेण्याची तंबी दिली आहे. साधारणपणे १२ विद्यार्थ्यांना परीक्षेपासून रोखले होते. मुख्याध्यापकांनी त्यांच्याही परीक्षा घेण्याचे कबूल केले आहे.’’ संजय जावीर, प्रशासनाधिकारी, पालिका शिक्षण मंडळ