आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवाराच्या वाढदिवसानिमित्त खो-खो स्पर्धा:मोहोळमध्ये उद्यापासून पुरुष-महिलाच्या स्पर्धेचे आयोजन

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खो-खो खेळाचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस 12 डिसेंबर आहे. हा दिवस खो खो दिन म्हणून राज्यात साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त मोहोळ येथे 12 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान पुरुष व महिला गटाच्या राज्य निमंत्रित खो खो स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा स्पर्धा अध्यक्ष यशवंत माने व स्पर्धा कार्याध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी दिली.

अदिती तटकरे, रोहित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री अदिती तटकरे आणि आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सोमवारी (दि.12) सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी बळीराम साठे, राजन पाटील, महेश कोठे, दिलीप कोल्हे व विक्रांत पाटील या मान्यवरासह भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव डॉ. चंद्रजित जाधव, राज्य खो खो संघटनेचे उपाध्यक्ष महेश गादेकर, सचिव गोविंद शर्मा आदी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय आणि सर्वोत्कृष्ट अष्टपैलू, संरक्षक व आक्रमक खेळाडूस रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येईल.

स्पर्धेची गटवार विभागणी

पुरुष : अ गट : शिर्सेकर्स महात्मा गांधी स्पोर्ट्स (मुंबई उपनगर), अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ (वेळापूर, सोलापूर), छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (उस्मानाबाद), साखरवाडी क्रीडा मंडळ (सातारा).

ब गट : विहंग क्रीडा मंडळ (ठाणे), सरस्वती स्पोर्ट्स क्लब (मुंबई), एकलव्य क्रीडा मंडळ (अहमदनगर), किरण स्पोर्ट्स क्लब (सोलापूर).

क गट : नव महाराष्ट्र संघ (पुणे), राणाप्रताप तरुण मंडळ (कुपवाड, सांगली), विद्यार्थी क्रीडा केंद्र (मुंबई), शिवप्रतिष्ठान खो खो क्लब (मंगळवेढा, सोलापूर).

ड गट : लोटस स्पोर्टस क्लब (सांगली), श्री सह्याद्री संघ (मुंबई उपनगर), उत्कर्ष क्रीडा मंडळ (सोलापूर), शेवगाव स्पोर्ट्स क्लब (शेवगाव, अहमदनगर).

महिला : अ गट : रा.फ. नाईक महिला खो खो संघ (ठाणे), आर्यन स्पोर्ट्स क्लब (रत्नागिरी), संस्कृती क्लब (नाशिक), साखरवाडी क्रीडा मंडळ (सातारा).

ब गट : राजमाता जिजाऊ संघ (पुणे), छत्रपती व्यायाम प्रसारक मंडळ (उस्मानाबाद), नरसिंह क्रीडा मंडळ (पुणे) कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब (वाडीकुरोली, सोलापूर).

बातम्या आणखी आहेत...