आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Sharad Pawar Nana Patole On Same Stage Solapur| Ravindra Dhangekar| Solapur Newsपवार, पटोले रविवारी‎ दिसणार एकाच मंचावर‎, आमदार रवींद्र धंगेकरांचा सांगोल्यात सत्कार‎

एकाच मंचावर:पवार, पटोले रविवारी‎ दिसणार एकाच मंचावर‎, आमदार रवींद्र धंगेकरांचा सांगोल्यात सत्कार‎

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर‎ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद‎ पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष‎ नाना पटोले हे आमदार रवींद्र धंगेकर‎ यांच्या सत्कारानिमित्त रविवारी‎ सांगोल्यात एकाच व्यासपीठावर येत‎ आहेत. रविवारी पवार हे सोलापूर‎ तर नाना पटोले पंढरपुरात मुक्कामी‎ आहेत. सध्याच्या राजकीय‎ घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा‎ कार्यक्रम चर्चेत आला आहे.‎

कसबा विधानसभेची प्रतिष्ठेची‎ पोटनिवडणूक महाविकास‎ आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र‎ धंगेरकर यांनी जिंकली. त्याबद्दल‎ त्यांचा सत्कार समारंभ आयोजित‎ केला आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ‎ नेते पवार व पटोले हे दोघेही‎ उपस्थित राहणार आहेत.

शेतकरी मेळावा

विशेष‎ म्हणजे गेली ४० वर्षे काँग्रेसमध्ये‎ राहिल्यानंतर शिवसेनेत जाऊन‎ आमदार झालेले शिंदे गटाचे शहाजी‎ पाटील यांच्या मतदारसंघात हा‎ कार्यक्रम होत आहे. पवार यांच्या‎ दौऱ्यात पंढरपुरात शेतकरी मेळावा‎ होणार आहे. त्यात साखर‎ कारखानदारीत आपले वर्चस्व‎ निर्माण करत असलेले अभिजित‎ पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतील,‎ अशी माहिती पुढे येत आहे. त्यांचा‎ प्रवेश झाला तर ते पंढरपुरातून‎ विधानसभेसाठीचे उमेदवार‎ ठरतील, अशी शक्यता आहे.‎

नाना पटोले यांचा दौरा

रविवारी सकाळी १०.१५ वाजता‎ ‎ विठ्ठल सहकारी‎ ‎ साखर कारखाना‎ ‎ स्थळावर त्यांचे‎ ‎ आगमन. दुपारी‎ ‎ १२ वाजता तेथील‎ ‎ कार्यक्रमाला‎ उपस्थिती. पाच वाजता मेडशिंगी‎ येथील कार्यक्रमाला उपस्थिती.‎ सायंकाळी ६ वाजता सांगोला येथे‎ आमदार रवींद्र धंगेकर यांच्या‎ सत्कार समारंभ. रात्री ८.३० वाजता‎ सोलापुरात माजी महापौर मनोहर‎ सपाटे यांच्याकडील कार्यक्रमाला‎ उपस्थिती. रात्री साेलापुरात मुक्काम.‎

रविवारी सकाळी सिद्धेश्वर‎ ‎ एक्स्प्रेसने‎ ‎ कुर्डुवाडी येेथे‎ ‎ आगमन. तेथून‎ ‎ सकाळी १०‎ ‎ वाजता माढा‎ ‎ येथील तालुका‎ काँग्रेसच्या मेळाव्याला उपस्थिती.‎ दुपारी २.३० वाजता महूद (ता.‎ सांगोला) येथील घरेलू महिलांच्या‎ मेळाव्यास उपस्थिती . सांगोल्यात‎ सायंकाळी सहा वाजता लोणारी‎ समाजाने आयोजित केलेल्या‎ आमदार धंगेकर यांच्या सत्कार‎ समारंभ . पंढरपुरात मुक्काम व‎ सोमवारी काँग्रेसचा कार्यक्रम.‎