आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंगळवारी शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे न घेतल्यास अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊ आणि पक्षाचे सदस्य म्हणून काम करण्याची भूमिका मांडली. शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठराव घेऊन प्रदेशपातळीवर तो पाठविला आहे.शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी कार्यालयात बैठक झाली. बैठकीस प्रवक्ते मनोहर सपाटे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, प्रदेश सरचिटणीस संतोष पवार, महेश गादेकर, शंकर पाटील, लता फुटाणे, सुनिता रोटे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पवारांच्या राजीनाम्याची खबर आल्यानंतर तातडीची बैठक झाली. पवार साहेबांनी राजीनामा मागे न घेतल्यास सामूहिक राजीनामे देण्यावर एकमत झाले. तसा ठराव करून प्रदेशपातळीवर पाठविण्यात आल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. सोलापूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी सत रस्ता येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो... मागे घ्या, मागे घ्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्या..अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी पवार साहेबांचे फोटो असलेले पोस्टर हातात घेतले होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, माजी नगरसेवक दीपक राजगे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलाचे शहर अध्यक्ष चंद्रकांत पवार, ज्योतिबा गुंड, सिद्धार्थ सर्वगोड, महेश कुलकर्णी, अबूबकार सय्यद, ऋषिकेश शिंदे, विकास शिंदे, अक्षय जाधव, अमित सुरवसे, सागर भोसले, शाहरुख हुच्चे, इरफान शेख, मुसा अत्तर, संदीप बुरकुल, लखन गावडे, बीरप्पा बंडगर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवारांनी राजीनामा देऊ नये. धोक्यात आलेली लोकशाही वाचवायची असेल तर त्यांचे नेतृत्व देशालाही हवे आहे. पवार हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. गेल्या ५० वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. पवार नाहीत तर आम्ही पण नाहीत. त्यांनी राजीनामा देणे म्हणजे लोकशाहीचे नुकसान ठरेल.'' -जनार्दन कारमपुरी, माजी महापौर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते
धाराशिवला पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जिल्ह्यातील पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. पवार यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्य व देशाला आजच्या कठीण काळात अत्यंत आवश्यक्ता आहे.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसलाही संघटनात्मक उर्जा मिळण्यासाठी वरिष्ठ उर्जा स्रोत म्हणून पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे, अशी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे राजीनामा देणाऱ्यांमध्ये जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा उपाध्यक्ष कादर खान, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सचिव मसूद शेख, धाराशिव तालुकाध्यक्ष शाम घोगरे, जिल्हा सरचिटणीस नितीन बागल, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एकंडे आदींचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.