आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी आमदार राहिलेल्या तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विनायकराव पाटील यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिसे महाविद्यालयामध्ये प्राचार्य पदाच्या भरती दरम्यान बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
भिसे महाविद्यालयाचे सभासद राजाभाऊ जयवंत सुसलादे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. के. एन. भिसे कला, वाणिज्य आणि विनायकराव पाटील सायन्स कॉलेजच्या प्राचार्य भरतीत बोगस कागदपत्रे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. विनायकराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.
विनायकराव पाटील यांच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपांचे प्रकरण हे माढा न्यायालयात गेले होते. यावेळी त्यांनी धर्मादाय आयुक्तांच्या न्याय निर्णयाच्या प्रकरणात बदसल करुन महाविद्यालयात प्राचार्य भरती केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर न्यायलयाच्या आदेशानंतर कुर्डूवाडी ठाण्यात विनायकराव पाटील यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
दोन वेळा आमदार राहिलेल्या आणि शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळख असलेल्या विनायकराव पाटील यांच्यावर दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्याने सोलापूरमध्ये खळबळ उडाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातही याबाबत छुपी चर्चा सुरु आहे. विनायकराव पाटील यांनी संस्थेचे प्राचार्य आर. आर. पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतःच्या लेटरहेडवर चुकीच्या गोष्टी दाखवल्याचाही आरोप आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.