आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी झाली:शरद पवार रविवारी सोलापूर दौऱ्यावर,‎ आज होणार निश्चिती; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता शिगेला‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार‎ यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे‎ त्यांचा रविवारचा नियोजित दौरा होणार‎ अथवा नाही याबद्दल उत्सुकता वाढली‎ आहे. या पार्श्वभूमीवर दौऱ्याबाबत अंतिम‎ निरोप गुरुवारी येणार असल्याची माहिती,‎ शहराध्यक्ष भारत जाधव यांनी दिली.‎

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद‎ पवार हे अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर‎ प्रथमच सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या‎ दौऱ्यात ते सांगोला, पंढरपूर आणि सोलापूर‎ शहरात विविध कार्यक्रमांना हजेरी‎ लावणार आहेत. या एक दिवसीय दौऱ्यात‎ एकही कार्यक्रम पक्षाकडून आयोजित‎ नाही. त्यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण झाल्याचे‎ शहराध्यक्ष जाधव यांनी सांगितले.‎