आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाॅवरफूल दौरा:शरद पवार सोलापूर दौऱ्यावर, पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शनानंतर म्हणाले - माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. ते आज पंढपुरात पोहचले व त्यांनी विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या सुख संपन्नतेसाठी त्यांनी पांडुरंगाला साकडे घातले आहे. तर विठूरायाच्या दर्शनानंतर माझ्या हृदयात फक्त विठ्ठलाचे स्थान असल्याचे शरद पवार म्हणाले.

2017 नंतर प्रथमच शरद पवार यांनी विठूरायाचे दर्शन घेतले. 2 मे रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर नेते, कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. यामुळे पवारांनी त्यांचा निर्णय बदलला. पण आता अधिक सक्रीय होण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी पुणे- सोलापूर-निपाणी दौरा करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज ते दौऱ्यावर निघाले असून पंढरपुरात पोहचले आहेत.

आज शरद पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंढरपूर येथे जात विठ्ठलाचे दर्शन घेतले. एक व्हीडिओ ट्विट करीत त्यासोबत लिहिले की, आज पंढरपूर दौर्‍यावर असताना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट देऊन विठ्ठल-रखुमाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी राज्यातील बळीराजाच्या सुख संपन्नतेसाठी विठ्ठल चरणी साकडे घातले. शरद पवार यांच्या पांडुरंगाच्या दर्शनाचा व्हीडिओही समोर आला आहे.

या वयातही दुर्दम्य ईच्छाशक्ती

शरद पवार 83 वर्षांचे आहेत. या वयातही ते तरुणांना लाजवेल असा दौरा करतात. आजच त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याबाबत घोषणा केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर यापुढे जास्त मेहनत करण्याची गरज असल्याचे सांगत आगामी दौराही त्यांनी माध्यमांना सांगून टाकला. तरुणांनाही थकवा येईल असा हा आगामी दौरा करणाऱ्या 83 वर्षांचे पवारांची ईच्छाशक्तीची दाद द्यावी लागेल.

कसा आहे दौरा?

शरद पवार म्हणाले, कार्यकर्त्यांनी मला एवढे संपर्क केले तेव्हा वाटले की, जास्त मेहनत करण्याची गरज आहे. मी त्यामुळेच येथून पुणेला जात आहे. तेथून सोलापूर नंतर सांगोला त्यानंतर पंढरपूर आणि तेथून मी निपाणी ला जाऊन परत येथे (मुंबईत) येणार आहे.