आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यूवरून संशय:शेळगी ; मृत्यूवरून संशय, स्मशानभूमीतून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झोपेतून न उठल्याने घरातील सदस्यांनी पाहिले असता प्रशांत शिवपुत्र सावळगी (वय ३२, रा. प्लॉट २१, भगवंत नगर, शेळगी) मृत्यू झाल्याचे आढळले. नातेवाइकांना बोलावून दुपारी शेळगी येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेले असताना अचानक पोलिस दाखल झाले. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने अंत्यविधी थांबवून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा काढल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. हा प्रकार गुरुवारी शेळगी येथे घडला.

याबाबत जोडभावी पेठ पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना हवालदार व्ही. पी. पैकेकरी म्हणाले, मृत “प्रशांत हे झोपेतून उठलेच नाहीत. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे स्पष्ट नव्हते. याबाबत कुटुंबीयांशी चर्चा करून अंत्यसंस्कार थांबवून मृतदेह थेट शासकीय रुग्णालयात पाठवला.

दरम्यान मृत प्रशांत यांच्या दोन्ही भावंडांशी संपर्क साधला असता, आमच्या कुटुंबीयांची त्या घटनेबाबत बोलण्यास सध्या मनस्थिती ठिक नसल्याचे सांगितले. मृत प्रशांत यांना काम नसल्याने अनेकदा घरीच रहात होते. त्यांचे वडील महापालिका परिवहन विभागातून सेवानिवृत्त झाले असून त्यांना दोन भावंडे आहेत. प्रशांत मोठे होते. व्हिसेरा अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे हवालदार पैकेकरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...