आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मानपत्र देऊन गौरव:शिरवाळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच व संत गाडगे महाराज विचारमंच ओतूर (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने संस्था संयोजक समितीतर्फे हरिश्चंद्र पाटील यांच्या शिरवाळ या कथासंग्रहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शिक्षक भवन, पुणे येथे नुकताच प्रदान करण्यात आला. हरिश्चंद्र पाटील यांच्या ‘शिरवाळ’ या कथासंग्रहाला मिळालेला हा पंधरावा पुरस्कार असून त्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हरिश्चंद्र पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील उत्कृष्ट कवी, लेखक आहेत. त्यांची आजवर हुंदके मातीचे काव्यसंग्रह, संस्कारफुले व शिरवाळ हे कथासंग्रह अशी तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना सदर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अंकुश गाजरे, सुनील पांडकर, गणपत जाधव, भास्कर बंगाळे, रहिमतुल्ला शेख, भागवत माळी, भास्कर सोनवणे, दत्तात्रय भुजबळ, पंडित वाघावकर, नाथा सावंत यांनी अभिनंदन केले व पुढील साहित्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...