आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Shiv Chhatrapatike Samman Mein Muslim Brigade Maidan, It Is Indecent For A Person Holding A Constitutional Position To Act Like This Haji Mateen Bagwan

शिवछत्रपतीके सन्मान में मुस्लिम ब्रिगेड मैदान मे:संवैधानिक पदावरील व्यक्तीने असे वागणे अशोभनीय- हाजी मतीन बागवान

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या संविधानीक पदांवर असलेली व्यक्ती जर देशात अशांतता, अस्वस्थता निर्माण करत असतील तर त्यांना त्या पदावर कार्यरत राहण्याचा अधिकार नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान मंगळवारी येथे म्हणाले.

देशाची एकात्मता, अखंडता, शांतता टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक सामान्य नागरिकाची आहे. तसेच संवैधानिक पदावरील व्यक्ती यासाठी कटिबद्ध असते. त्यांचे ते आद्य कर्तव्य आहे. पण मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सतत बहुजन महापुरुषांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. या त्यांच्या वक्तव्यांनी समाजात अशांतता निर्माण होत आहे. त्यांची वक्तव्य हे अविचारी आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीने असे वागणे हे निश्चितच अशोभनीय आहे. त्या पदाचा अपमान आहे, त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रपतींनी पदमुक्त करावे, अशी मागणी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांनी व्यक्त केले.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणूनबुजून जे सातत्याने अवमान करत आहेत. याचा निषेध म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुक आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, तन्वीर गुलजार, पोपट भोसले आदी उपस्थित होते.

तोंडावर काळया पट्ट्या बांधून हातात राज्यपाल आणि भाजपा प्रवक्ता यांच्या निषेधाचे फलक घेऊन पुतळ्या भोवती कडे करून उभे होते. छत्रपती शिवरायके सन्मान मे, मुस्लिम ब्रिगेड मैदान में हे फलक लक्ष वेधून घेत होते. एक शब्द ही न उच्चारता फलकांतून भावना व्यक्त करत आंदोलन स्थळ सोडण्यात आले. पुतळ्याभोवती दररोज आंदोलने सुरू असल्याने तिथे पोलिसांचा पाऊस फाटा तैनातच होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची यंत्रणा काळजी घेत होती.

बातम्या आणखी आहेत...