आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री बोम्मई यांचा पुतळा जाळून निषेध:शिवसेना (बाळासाहेबांची) युवा सेना आक्रमक

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये काल कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेच्या वतीने शुक्रवारी सोलापुरात कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत जोरदार घोषणा दिल्या.

युवा सेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख सागर शतिोळे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्राचा द्वेष आणि आंदोलन थांबवा अन्यथा कर्नाटकमध्ये येऊन मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळू, असा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला आहे. यापुढील काळात अशा प्रकारचं भाष्य जर केलं तर त्याला तसेच उत्तर देण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना शहर उपप्रमुख किशोर चव्हाण, उपशहरप्रमुख शिवराज विभुते, विभागप्रमुख येशू मद्री, युवासेना उपशहरप्रमुख पद्मसिंह शिंदे, उपशहरप्रमुख ऋषी घोलप आदी उपस्थति होते.

बातम्या आणखी आहेत...