आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:विद्यापीठाच्या वतीने शिवज्योत रॅली

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवज्योत रॅली काढण्यात आली.

शिवज्योत रॅलीमध्ये शहरातील संगमेश्वर, वालचंद, दयानंद, डी. ए. व्ही. वेलणकर, वसुंधरा कॉलेज, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ आणि छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयातील एनएसएस आणि क्रीडा विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे एक हजार विद्यार्थी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते.

प्रारंभ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते छ. शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवज्योत रॅलीचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. गुणवंत सरवदे उपस्थित होते.

वसुंधरा कला महाविद्यालय
शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर संचलित वसुंधरा कला महाविद्यालयात ‘शिवस्वराज्य दिन’ साजरा झाला. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मीना गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचिता गायकवाड यांनी केले. आभार डॉ. एम टी. घंटेवाड यांनी मानले. सूत्रसंचालन तैसिन पटेल या विद्यार्थिनीने केले.

बातम्या आणखी आहेत...