आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Shivrajyabhishek On Monday At Raigad, Five Thousand Mavals Going Through Solapur; Various Programs By Shivrajyabhishek Mahotsav Samiti |marathi News

सोहळा:रायगडावर सोमवारी शिवराज्याभिषेक, सोलापुरातून जाणार पाच हजार मावळे; शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रम

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दि.५ व ६ जून रोजी दुर्गराज रायगडावर युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थित शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. यंदा “धार तलावारीची युध्दाकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीचा, स्वराज्याच्या इतिहासाचा’ व “सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असतील. या सोहळ्यास शिवभक्तांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीतर्फे केले आहे.

छत्रपती शिवरायांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी लोकशाहीच्या तत्त्वावर स्वराज्याची उभारणी केली. अठरा आलुतेदार, बारा बलुतेदारांना सोबत घेऊन स्वराज्यात ऐक्य घडवले. छत्रपती शिवरायांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. स्वराज्याला छत्रपती मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात ही घटना इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद घेणारी ठरली. हा दिवस म्हणजे खऱ्या अर्थाने भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन. तो राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती कार्यरत आहे. राज्याभिषेकाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात. यासाठी समितीतर्फे राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होतो.

सांस्कृतिक, पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर
यंदा पाच जूनला सायंकाळी ५ वा. ‘धार तलवारीची युद्ध कला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युध्द कला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी राज दरबार येथे जागर शिवशाहीचा, स्वराज्याच्या इतिहासाचा हा शाहिरी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर यांनी सहभाग घ्यावा. दि ६ जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक झाल्यानंतर सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बुलतेदार,अठरा आलुतेदार सर्व धर्मातील लाेक सहभागी होणार आहेत. आपापल्या सांस्कृतिक पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर होईल. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल.या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

जिल्हाभरातून नियोजन सुरू
कोरोनानंतर दोन वर्षांनी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. त्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील शिवप्रेमी उत्सुक आहे. ५ व ६ जून रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातून सुमारे ५ हजार मावळे या सोहळ्यासाठी जातील. जिल्हाभरातून तसे नियोजन सुरू आहे.
माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...