आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉपिंग उत्सव:गुजराती मंडळातर्फे शॉपिंग उत्सव; आयोजित श्रावण शॉपिंग उत्सवचे उद्घाटन

सोलापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर गुजराती मित्रमंडळ संचालित महिला विभागाद्वारे आयोजित

उद्घाटन शुक्रवारी प्रिसिजन कॅमशॉफ्टसच्या डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते झाले. रविवारपर्यत चालणाऱ्या या प्रदर्शनात महोत्सवात विविध प्रकारच्या राख्यांसह साडी, इमिटेशन, डायमंड ज्वेलरी, कॉस्मेटिक्स, किचन साहित्य, होम मेड केक्स आदीचे स्टॉल्स ठेवण्यात आले आहेत. राखी पौर्णिमा आणि श्रावणानिमित्त खरेदी करणाऱ्या महिलांसाठी ही एक पर्वणीच आहे. कल्पना टॉकीज जवळील गुजरात भवनच्या वातानुकूलित हॉलमध्ये सकाळी १० ते ८ पर्यंत तर रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे. उदघाटनप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मुकेश मेहता महिला विभागाच्या अध्यक्ष पारुल पटेल व सचिव प्रज्ञा ठक्कर आादी उपस्थित होते. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन गुजराती मंडळ महिला विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...