आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातही कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर दोन दिवसांपासून कोविशिल्ड लस उपलब्ध नव्हती. शुक्रवारी जिल्ह्यात तीन हजार कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाला. त्यातील शहरासाठी एक हजार डोस दिले आहेत. केंद्राकडूनच राज्याला कोविशिल्ड मिळाले नसल्याने अडचण झाली आहे. दरम्यान, जिल्ह्याने तीन लाख डोसची मागणी केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवी वर्षानिमित्त लाभार्थींना ३० सप्टेंबरपर्यंत १८ वर्षाच्या पुढील वयोगटाला मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांवर लस घेण्यासाठी लाभार्थी गर्दी करत असल्याने केंद्रावरील कोविशिल्डच्या डोसचा तुटवडा झाला आहे. कोव्हॅक्सिनचे ४० हजार व कोर्बोव्हॅक्सचे ६० लसीचा साठा जिल्ह्यात आहे. आजपर्यंत जिल्ह्यात आजपर्यंत पहिला डोस ३२ लाख ४२ हजार ७७८(८५.६३टक्के) तर दुसरा २४ लाख ३१ हजार ४०० (६४.२० टक्के) जणांनी घेतला आहे. बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या एक लाख ३१हजार १९२ इतकी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.