आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन तरुणांवर गुन्हा:वाॅकिंग करताना चाकू दाखवून मंगळसूत्र हिसकावले ; पंधे अपार्टमेंटजवळील घटना

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पहाटेच्या वेळी घराजवळ वाॅकिंग करणाऱ्या महिलेचे चाकूचा धाक दाखवून एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार मंगळवारी घडला. भारती रवींद्र बागदुरे (वय ६२, रा. पंधे अपार्टमेंट, प्रभाकर महाराज मंदिराजवळ) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. बागदुरे यांचे भाजी मंडईजवळ झेरॉक्स दुकान आहे. दररोज पहाटे चारच्या सुमारला त्या घराजवळील मोकळ्या मैदानात वाॅकींगसाठी जातात. नेहमीप्रमाणे वाॅकिंग करताना तिघे तरुण मोटरसायकलवरून आले. त्यापैकी एकाने मंगळसूत्राला हिसका मारला. यावेळी बागदुरे या खाली पडल्या. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला आणि प्रतिकारही केला. पण त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. दुसऱ्या तरुणाने मंगळसूत्र घेऊन जुना पुणे नाका दिशेने पळाला. यानंतर बागदुरे या आपल्या घरी जाऊन पतीला माहिती दिली. पोलिसांना घटनेची माहिती दिली. फौजदार चक्रधर ताकभाते हे अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...