आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील ३१ वर्षीय आंतरराष्ट्रीय कँडिडेट मास्टर व प्रशिक्षक श्रेयांस शहा यांनी एकाच वेळी पाच तासांत १०२ बुद्धिबळपटूंशी सामना करत एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद केली. त्यात त्यांनी १०१ खेळाडूंना हरवले तर सात वर्षीय सृष्टी मुसळेने बरोबरीत रोखले.या उपक्रमाचे आयोजन ज्ञानप्रबोधनी प्रशालेतील उपासना मंदिर येथे रविवारी केले होते. यात ज्ञानप्रबोधनी, इंडियन मॉडेल, लिटिल फ्लॉवर, पोलिस पब्लिक स्कूल, ऑर्किड प्रशाला, सेंट जोसेफ, संगमेश्वर पब्लिक या प्रशालेमधील अत्यंत गुणवंत होतकरू व चौकस खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पाच तास झालेल्या प्रदीर्घ लढतीत आदित्य डोके, हर्ष मुसळे व मणिपूरचा खेळाडू जॉन तांगतीनलेन होकीप यांनी अत्यंत चुरशीची लढत देत अनुभवी श्रेयांसवर चांगलेच दडपण आणले होते. परंतु सर्वात नेत्रदीपक कामगिरी केली ती ज्ञानप्रबोधनीची सात वर्षीय सृष्टी मुसळे हिने.
या उपक्रमाची संकल्पना ज्ञानप्रबोधनीचे विश्वस्त अमोल गांगजी यांची होती. यावेळी बुद्धिबळपटुंना मार्गदर्शन करताना शहा यांनी सायमलटेनियस बुद्धीबळ म्हणजे नक्की काय, त्याचा इतिहास, त्याचे नियम, व त्या संदर्भातील जागतिक घडामोडी याची अभ्यासपूर्ण मांडणी केली. याचे उद्घाटन उद्योजक राहुल शहा यांनी केले. भारत तिबेट मंचाचे अप्पू कुगणे यांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे बौद्धिक व शैक्षणिक फायदे समजून सांगितले. सूञसंचालन प्रविण तळे यांनी केले. मुख्य पंचाची भूमिका अथर्व बडवे यांनी सांभाळली. तसेच यश इंगळे, रोहन सरवदे, राजेश वडीशेरला यांनी सहायकाची भूमिका बजावली.
सृष्टी ही श्रेयांसला सारखे चेक देत होती, शेवटी डाव बरोबरीत रोखला पाच तास चाललेल्या उत्कंठता पूर्वक लढतीमध्ये श्रेयांसच्या आक्रमक डावपेचीना आपल्या अभेद्य बचावाने नेस्तनाबूत करून सृष्टीस बरोबरीत रोखले. स्कँडिविअन ओपनिंगने सुरवात झालेल्या डावात सुरवातीलाच सृष्टीने विरूद्ध बाजूला कॅस्टलींग करून आपण कुठल्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या सामोरे जाऊ शकतो असे सूचित केले. नंतर श्रेयांसने सृष्टीच्या राजावर केलेल्या आक्रमणाला धिरोधातपणे सामना करत योग्य बचाव केला. नंतर श्रेयांसच्या राजावरती प्रतिआक्रमण करून त्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला व शेवटी श्रेयांसला सारखे चेक देणे भाग पाडून डाव बरोबरीत रोखला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.