आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबार्शी नगरपालिका, भगवंत देवस्थान ट्रस्ट व भगवंत महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या भगवंत महोत्सव २०२२ चा शुभारंभ प्रकाश बोधले महाराज यांच्या हस्ते भगवंताच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र राऊत होते.
या वेळी माजी मंत्री दिलीप सोपल, माजी खासदार शिवाजी कांबळे, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, असिफ तांबोळी, मंगल शेळवणे, मुख्याधिकारी तथा अमिता दगडे, भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दादा बुडूख, भगवंत महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे, वर्षा ठोंबरे, माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, अशोक सावळे, विलास रेणके, विलास जगदाळे, कुंडलिक गायकवाड, नाना सुरवसे, कृष्णराज बारबोले, संतोष सूर्यवंशी, अभिजित सोनिग्रा, सचिन मडके, धनंजय जगदाळे, राजश्री डमरे-तलवाड, अविनाश गायकवाड, शंकर वाघमारे, वर्षा रसाळ, श्रीकांत शिंदे, सुधीर बारबोले, सोमाणी, देवकीनंदन खटोड आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी यानी केले. प्रा. कॉ. तानाजी ठोंबरे यांनी समाजात तणाव व तंटा नको तर सौहार्द वाढीस लागावे. अशा महोत्सवातून प्रेम, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा, अशी सद्भावना व्यक्त केली. आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, भगवंताचे जगाच्या पाठीवर एकमेव मंदिर आहे. महोत्सवाच्या निमित्ताने राजकीय नेते एकाच व्यासपीठावर आले. तीर्थक्षेत्र विकासाअंतर्गत पालिकेने २२५ कोटींचा आराखडा पाठवला आहे.
माजी मंत्री दिलीप सोपल म्हणाले, भगवंत महोत्सव हा सर्वांचा आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून प्रबोधनाचे व करमणुकीचे कार्यक्रम होत आहेत. तसेच यात स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टेज उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्वांनीच भगवंताच्या आशीर्वादाने पुढे जावे तरच आपल्याला परमेश्वर भेटणार आहे. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला भगवंत अशी भावना व्यक्त केली. सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले. पहिल्या दिवशी प्रकाश बोधले महाराज यांचे कीर्तन झाले. या वेळी भाविक उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.