आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे 29 डिसेंबर ते 2 जानेवारी असे पाच दिवस होम मैदानावरती आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी सिद्धेश्वर मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेदरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. परंतु होम मैदानावर मर्यादित जागेत हे प्रदर्शन भरविण्यास अडचणी निर्माण होत होत्या. म्हणून यंदा यात्रेच्या पूर्वी ह्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
यांचा असणार सहभाग
या प्रदर्शनामध्ये दुग्धोत्पादन, रेशीम पीक, मधुमक्षिका पालन ,वर्टीकल फार्मिंग, आधुनिक कृषी अवजारे, खते, औषधे ,बी- बियाणे, अवजारे ,यंत्रसामुग्री,, ट्रॅक्टर्स, फार्म इक्विपमेंट, सिंचन, फलोत्पादन ,पॅकेजिंग, व साठवणूक ,बायोटेक्नॉलॉजी, टिशू कल्चर, पाणी व्यवस्थापन, ऑटो फार्मिंग टेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, डेरी इक्विपमेंट, पोल्ट्री सोल्युशन, कृषी अर्थसाह्य, लो बजेट हाऊसिंग सोल्युशन ,कृषी साहित्य, नियतकालिके अशा संस्थांचा सहभाग असणार आहे. या प्रदर्शनामध्ये 300 हून अधिक कंपन्यांचा समावेश असणार आहे.
एक कोटी रुपयांचा रेडा
दीड टन वजनाचा व एक कोटी रुपये किमतीचा गजेंद्र नावाचा रेडा असणार आहे यामध्ये 200 पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे ट्रॅक्टर व शेती अवजारे यांचे स्टॉल आहेत वाहन महोत्सव आहे. शेतीविषयक प्रक्रिया उद्योग महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने सेंद्रिय शेतीचे विशेष दालन पशुपक्षी प्रदर्शन दुर्मिळ देशी 500 हून बियाणांचे प्रदर्शन व विक्री तांदूळ महोत्सव परदेशी भाजीपाला व कृषी तज्ञांची मार्गदर्शने दोन विषयक दालन सौर ऊर्जा विषयक सेपरेट झालं. जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोंबी व 140 ते 50 दाणे तयार होणारी कुदरत 100 व आठ इंच लांबीची लोंबी ही देशी बियाणे ची माहिती व प्रदर्शन सेंद्रिय शेतीसाठी विशेष मार्गदर्शन गोड्या पाण्यातील मोत्याची शेती जगातील सर्वात लांब एक फूट लांबीची देशी मिरची फळे व फुले प्रदर्शन स्पर्धा गाय म्हैस व बैल प्रदर्शन आधी एकाच प्रदर्शनामध्ये उपलब्ध असणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.