आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचा ७ हजार ५०० मेट्रिक टन विस्तारीकरण प्रकल्प ‘पर्यावरण अनुकूल’ (इसी : एन्व्हायरमेंट क्लिअरन्स) नाही, या याचिकेवर सुनावणी घेऊन राष्ट्रीय हरित लवादाने गाळप थांबवण्याचा आदेश केला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत दररोज ५ हजार मेट्रिक टन गाळप करण्याच्या अटीवर स्थगिती दिली. कारखान्याचे माजी तज्ञ संचालक संजय थोबडे यांनी लवादाकडे याबाबतची याचिका दाखल केली आहे. त्यावर डिसेंबरमध्ये सुनावणी झाली.
त्या वेळी लवादाने विस्तारित प्रकल्प पर्यावरण अनुकूल होईपर्यंत गाळप बंद ठेवण्याचा आदेश दिला. पुढील सुनावणीची तारीख ९ जानेवारीला होईल, असेही सांगितले.या कालावधीत कारखान्याला सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभा होती. त्यानुसार कारखान्याने अपील केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांनी पुढील सुनावणीपर्यंत कारखान्याने पाच हजार मेट्रिक टन गाळप करण्याच्या अटीवर लवादाच्या आदेशाला स्थगिती दिली.
बेकायदेशीर कामांमुळे भुर्दंड सोसावा लागेल कारखान्याने २०१७ मध्ये विस्तारीकरण प्रकल्प राबवला. ज्यामध्ये २ हजार ५०० ची गाळप क्षमता ७ हजार ५०० मेट्रिक टन (प्रती दिन) केली. २० किलोलिटर आसवनी (डिस्टीलरी)ची क्षमता प्रती दिनी १०० किलोलिटर झाली. ३८ मेगाव्हॅट सह वीजनिर्मिती प्रकल्पासाठी जमिनीपासून ९२ मीटर उंच चिमणी बांधली. यातील कुठल्याही प्रकल्पाला पर्यावरणीय अनुकूलता नाही. वास्तविक प्रकल्प राबवण्यापूर्वीच त्याची पूर्तता करून घेतली असती तर कोर्ट-कचेऱ्या झाल्या नसत्या.
त्याचा खर्चही वाचला असता. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ७ हजार ५०० मेट्रिक टन गाळप क्षमता असूनही ५ हजार मेट्रिक टन ऊस गाळावा लागेल. पूर्ण क्षमतेने कारखाना चालला नाही तर नुकसान कारखान्याचे आहे. केवळ बेकायदेशीर कामांमुळेच कारखान्याला भुर्दंड सोसावा लागेल, हा कारभार कुणाचा आहे, हे शेतकरी सभासदांनी लक्षात घ्यावे. - संजय थोबडे, माजी तज्ञ संचालक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.