आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्री उपोषण:विमानसेवेसाठी सह्यांची मोहीम; मान्यवरांचा पाठिंबा

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर विकास मंचच्या वतीने होटगी रोडवरील सोलापूर विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी रविवारपासून चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. सोमवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता या दिवशी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. उपोषणात सहभागी मान्यवरांनी माईक वर येणाऱ्या जाणाऱ्यांना आवाहन केले तेव्हा अनेक विद्यार्थी, नागरिक, व्यापारी याठिकाणी येवून स्वाक्षरी करुन या उपोषणाला पाठिंबा देत असल्याचे चित्र होते.

सोमवारी उपोषणस्थळी चंदूभाई देढीया, योगीन गुर्जर, विजय जाधव यांच्यासह काही स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या आंदोलनास विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिली आहे. उद्योजक राम रेड्डी यांनीही उपोषणस्थळी भेट देत पाठिंवा दिला.

बातम्या आणखी आहेत...