आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादहापैकी सहा ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. प्रतिष्ठेच्या नेमतवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे याना धक्का बसला. सरपंचपदी विठ्ठल परिवाराचा उमेदवार विजयी झाला. तुंगतमध्ये परिचारक गटाची सत्ता गेली. खेडभोसेतही परिचारक गटाला पराभूत व्हावे लागले आहे.
मेंढापुरात विठ्ठल परिवाराने कायम राखली आहे. बार्डी, व्होळे, खरातवाडी, टाकळी गुरसाळे आणि सुगाव खेडभोसे या पाच गावात स्थानिक समविचारी आघाड्यानी सत्ता मिळवली. पुळूजवाडी हि एकमेव ग्रामपंचायत ताब्यात राखण्यात परिचारक गटाला यश आले. एकूण ११ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. पैकी सुगाव खेडभोसे ग्रापंचायत बिनविरोध झाली होती. निवडणूक निकाल जाहीर होताच सर्व विजयी उमेदवार आणि समर्थकांनी जल्लोष करीत शहरातून आणि गावात विजयी मिरवणूका काढल्या. अनेक वर्षानंतर खेडभोसे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासह ९ पैकी ८ जागा विठ्ठल परिवाराने जिंकल्या. मात्र परिवाराचे महत्वाचे उमेदवार बंडू पवार यांचा केवळ १४ मतांनी पराभव झाला.
तुंगत या महत्वाच्या ग्रामपंचायतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. काँग्रेस नेते प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल परिवार पॅनेलला सर्व १२ जागा देतानाच तुंगतकरांनी सरपंच म्हणून डॉ. अमृता रणदिवे यांची निवड केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.