आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकास:जिल्हाधिकारी शंभरकर यांना कौशल्य विकासचा पुरस्कार ; हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला

सोलापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाच्या ‘जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत (२०२०-२१)’ सोलापूर जिल्ह्याला प्रशस्तिपत्रक श्रेणीत (लेटर ऑफ ॲप्रिसिएशन) पुरस्कार जाहीर झाला होता. गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी (दि.९) पुरस्कार स्वीकारला. कौशल्य विकासाबाबत उल्लेखनीय काम केल्याने सोलापूर जिल्ह्याला केंद्र सरकारचा जिल्हा कौशल्य विकासाचा पुरस्कार जाहीर झाला होता. सोलापूरच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने कोरोना काळात बेरोजगारांचा ऑनलाइन रोजगार मेळावा घेऊन हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. सोलापूरसह, सातारा, सिंधुदुर्ग, वाशिम, ठाणे या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्राथमिक स्तरावर ३० जिल्ह्यांची केंद्रीय समिती समोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील सोलापूरसह पाच जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता. पुरस्कारांमध्ये सोलापूर (लेटर ऑफ अॅप्रेंसिएशन), सातारा आणि सिंधुदुर्ग (अवॉर्ड फॉर एक्स्लन्स), वाशीम आणि ठाणे (सर्टिफिकेट ऑफ एक्स्लन्स) याप्रमाणे पुरस्कार जाहीर झाले होते. देश पातळीवर या पुरस्कार स्पर्धेत देशातील ३३६ जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता.

बातम्या आणखी आहेत...