आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:तलाव दुरुस्तीप्रकरणी टेंभुर्णीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयात गाळ टाकला

टेंभुर्णीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत कार्यालयात मातंग तलाव आणि ब्राम्हण तलावातील मैला मिश्रित गाळ व घाणीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक रहिवाशांना याचा सामना करावा लागत आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी तलावातील घाण पाणी व गाळ ग्रामपंचायत कार्यालयात टाकून आंदोलन केले. भाजप तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही तलावातील गाळ टाकून आंदोलन केले.

मागणी हे दोन्ही तलाव स्वच्छ करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली होती. या ठिकाणच्या रहिवाशांना जगणे मुश्किल झाले असून, दोन वर्षांपूर्वी या दोन तलावातील संपूर्ण घाण काढून तिथे अतिक्रमण होऊ नये म्हणून कंपाउंड करण्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता. त्या बाबतीत अनेक वेळा निवेदन देऊन ग्रामपंचायतने कोणतीही दखल न घेतल्याने सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात दोन्ही तलावातील घाण आणून टाकण्याचे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजप तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सूरजा बोबडे, जयवंत पोळ, नागनाथ वाघे, भाऊसाहेब महाडिक, हरिभाऊ सटाले, गिरीश ताबे, विकास धोत्रे, जाधव मेंबर, संतोष वाघे, बाळासाहेब ढगे, गौतम कांबळे, विजयभाऊ कोकाटे, सतीश नेवसे, विकास सुर्वे, संदीप देशमुख, संभाजी देशमुख, प्रकाश देशमुख, अविनाश धोत्रे, रणधीर जगताप, अनंता पोळ, रणजीत पोळ, प्रशांत पोळ, राजू पोळ, राहुल देशमुख, बाळासाहेब खरात तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...