आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकाम:पालिकेजवळच स्मार्टमाॅडेल रस्ता खाेदला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला, रंगभवन ते डाॅ. आंबेडकर चौकापर्यंत २२ कोटी रुपये खर्च करून माॅडेल रस्ता केला. हा रस्ता कधीच खोदणार नाही असा धांडोरा पिटण्यात आला. पण याच डाॅ. आंबेडकर चौकाकडून महापालिकेकडे जाणाऱ्या रस्ता ब्रेकर लावून फोडण्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी सुरू होता. स्मार्ट रस्ता फोडण्याचे धाडस केबल कंपनीने केले असून, त्यास महापालिकेने धाडसाने परवानगी दिली कशी? असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. शहराचा २२ कोटींचा माॅडेल रस्ता, डक्ट असताना खोदाई कसे?

स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने रस्ता करताना यापुढे हा रस्ता खोदणारा नाही असे सांगून डक्ट टाकण्यात आले. नव्याने पाण्याचे व ड्रेेनेज लाइन घालून फुटपाथ तयार करण्यात आला. दोन किमी रस्त्यासाठी विक्रमी २२ कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्या रस्त्याच्या बाजूने असलेला फुटपाथ फोडण्याचा प्रयत्न केबल कंपनीकडून सुरु आहे.

ब्रेकर चालक पळून गेला
स्मार्ट सिटीच्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथला ब्रेकर लावण्यात आला. सिमेंट रस्ता फोडताच असे का? विचारले असता, ब्रेकर चालक ट्रक्टरसह परागंदा झाला.

डक्ट असताना खोदाई
महापालिका आवारात नेटवर्क येत नसल्याने त्यास गती देण्यासाठी केबल टाकण्यासाठी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. महापालिका आवारात जिओ कंपनीचे टाॅवर आहे, त्यास जोडणी करण्यासाठी केबल खोदकाम सुरु आहे.

रस्त्याच्या बाजूने असलेल्या फुटपाथवर डक्ट करुन त्यातून केबल टाकण्याची सोय आहे.तरी खोदकाम करण्यात येत आहे. याबाबत महापालिका प्रभारी नगर अभियंता लक्ष्मण चलवादी यांना विचारले असता, त्यांना काही भागात काम करण्यासाठी परवानगी दिली आहे. सविस्तर काय आहे हे पाहून सांगतो असे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...