आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचे आवाहन:एसएमएसने गंडवण्याचे प्रकार वाढले ; वैयक्तिक मोबाइल मेसेजला प्रतिसाद देऊ नका

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बनावट एसएमएस पाठवून वीज ग्राहकांना लुबाडण्याचे प्रकार घडत अाहेत. वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून आलेल्या एसएमएसला प्रतिसाद देऊ नका, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे. बनावट एसएमएसद्वारे संपर्क साधणे, लिंक पाठवून किंवा साॅफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगून ऑनलाइनद्वारे आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकार सर्वत्र होत असून, मुंबईत जास्त प्रमाणात होत आहेत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोलापुरात असा प्रकार घडला होता. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टीमद्वारे ‘एसएमएस’ पाठवण्यात येतात आणि त्याचा सेंडर आयडी हा ‘एमएसईडीसीएल’ (उदा. VM-MSEDCL, VK-MSEDCL) असा आहे. तसेच या अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क करण्यास कळवले जात नाही, ही बाब ग्राहकांनी सदैव ध्यानात ठेवण्याची गरज आहे. धाेकादायक विद्युत उपकरणाविषयी तक्रारी देता येतात. तसेच महावितरणाकडून रीडिंग, बिल, देय दिनांक, वीजपुरवठा खंडित असेल तर त्या संबंधी एसएमएस महावितरणकडून वीजग्राहकांना येतात. काही शंका व तक्रारी असल्यास वीजग्राहकांनी २४ तास सुरू असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर किंवा नजीकच्या कार्यालयांशी संपर्क साधावा. तसेच अशाप्रकारे संदेश आल्यास ग्राहकांनी cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रारीची नोंद करावी, असेही आवाहन केले आहे.

खात्री केल्याशिवाय व्यवहार करू नका ^शहानिशा केल्याशिवाय एसएमएसला प्रतिसाद देऊ नये. तसेच त्यावर आर्थिक व्यवहार करू नये. कोणालाही आपला ओटीपी किंवा आपल्या बद्दलची माहिती देऊ नये.’’ सय्यद शौकतअली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर विभाग

बातम्या आणखी आहेत...