आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पकडले:दोन ठिकाणी नाग आढळले, सर्पमित्रांनी पकडले

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर परिसरात नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर घराच्या अंगणामध्ये नाग आढळला. बाळे येथील नागराज नगर, अवंतीनगर या दोन्ही नाग आढळला. सर्पमित्रांनी त्यांना पकडून निसर्गात मुक्त केले. बाळे येथील नागराज नगरमध्ये सुरेश मोटे यांच्या घरासमोर पाणी थांबले होते. पाण्याचा निचरा झाल्यानंतर चप्पल ठेवण्याच्या स्टँडमध्ये एक मोठा नाग दिसला. भयभीत कुटुंबाने वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनच्या सदस्यांना माहिती दिली. सर्पमित्र सुरेश क्षीरसागर यांनी तीन फूट लांबीचा विषारी नाग साप पकडून त्यास निसर्गात मुक्त केले.

वसंत विहारमध्ये ५ फूट नाग
वसंत विहार येथे असलेल्या संकेतनगर येथील निवासी विलास शिंदे यांच्या घरात सुमारे पाच फुटांचा नाग आढळून आला. नॅचरल ब्ल्यू कोब्रा संस्थेचे अध्यक्ष अनिल अलदार यांना घटनेची माहिती दिली. अलदार यांनी अतिशय शिताफीने नागास पकडले. लोकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देत, भीती दूर केली.

बातम्या आणखी आहेत...