आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची सद्यस्थिती आणि सुधारणांचे पर्याय यावर कोविडनंतर जोरदार चर्चा सुरू आहे. गावपातळीवर जन आरोग्य समित्यांच्या माध्यमातून सरकारी आरोग्य सेवांवर सनियंत्रण व जनरेटा उभारला तरच सार्वजनिक आरोग्य सेवा टिकेल. जन आरोग्य समितीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रात मिळणाऱ्या सेवांवर सोशल ऑडिट, जनसंवाद असे उपक्रम घेऊन सामान्य रुग्णांच्या हितासाठी आरोग्य क्षेत्र कसे कार्यरत राहील, यावर कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांनी भर द्यावा, असे अनुसंधान ट्रस्टचे समन्वयक भाऊसाहेब आहेर यांनी सांगितले.
अस्तित्व संस्था, सांगोला व अनुसंधान ट्रस्ट साथी (पुणे) यांच्या वतीने “कोविडचे अनुभव व धडे” आरोग्यासंबंधी ‘नवी जुनी आव्हाने आणि आरोग्य व्यवस्था पुनर्बांधणी ची दिशा’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा सोलापूर येथे झाली. कार्यशाळेस सांगोला, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, दक्षिण सोलापूर व सोलापूर शहरातील विवीध क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी होते. कार्यशाळेत भाऊसाहेब आहेर बोलत होते. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे हाेते. रवींद्र मोकाशी, व्ही. डी. गायकवाड, पत्रकार दीपक जाधव (पुणे) यांनी साेलापूर शहरातील विदारक आराेग्य व्यवस्थेवर सविस्तर भाष्य केले.
विनोद शेंडे यांनी रुग्ण हक्काची सनद व रुग्ण हक्कांबाबत जनजागृती व अंमलबजावणी कशी करता येईल याबाबत मांडणी केली. महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट कायद्यातील नव्या तरतुदी आणि संधी याबाबत ही मांडणी केली. महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि ट्रस्ट हॉस्पिटल्स या विषयांची मांडणी डॉ. दीपक वाघमारे यांनी केली. कार्यशाळेचे प्रास्ताविक अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष शहाजी गडहिरे यांनी केले. कार्यशाळा घेण्यामागची भूमिका मांडली व कोविडच्या काळात आलेले अनुभव यावर चर्चा झाली.
कार्यशाळेत ठरवण्यात आले कृती कार्यक्रम
जन आरोग्य समित्या गाव पातळीवर स्थापन करा, समितीच्या बैठकांवर देखरेख, नियंत्रण ठेवा, सोशल ऑडिटचा आग्रह धरा, खासगी दवाखान्यात दर पत्रके, रुग्ण हक्क सनदचा आग्रह करा, तक्रार निवारण समित्या स्थापन कराव्यात, गाव पातळीवर आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता समित्या सक्षम करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.