आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्री अत्याचार, पुरुषप्रधान संस्कृती, स्त्री-पुरुष समानता, जातीयवाद, धर्मवाद, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासोबतच राज्यातील सत्तांतर महानाट्यावर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईने पथनाट्यातून टीकास्त्र सोडत समाजप्रबोधन केले. समूहगीतामधून देशभक्तीचा जागर झाला, तर लोकगीतांवर महोत्सवातील तरुणाईने नाचत आनंद द्विगुणीत केला.
संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पाणी विषयावर चांगले पथनाट्य सादर केले. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अवयदानावर पथनाट्य केले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठाच्या संघांनीही पथनाट्ये सादर केली. त्याला दाद मिळाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने उत्कृष्टरीतीने ‘प्रश्न विचारायलाच हवे’ या विषयावर पथनाट्य केले.
महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प अन्य राज्यात गेले, राज्यातील सत्तांतर यासोबतच भगव्या रंगाच्या बिकिनीची चर्चा, प्रसार माध्यमांचे अस्तित्व धोक्यात आदी विषयांना स्पर्श केले. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक उत्कर्ष महोत्सव होत आहे. त्याचा बुधवारी तिसरा दिवस होता.विद्यापीठ कॅम्पसमधील हॉलीबॉल मैदानावर पथनाट्याच्या स्पर्धा रंगल्या. त्यानंतर निबंध स्पर्धा पार पडली. दुपारी मुख्य रंगमंचावर समूहगीताच्या स्पर्धा खूपच जल्लोषात झाल्या. सायंकाळी भितीचित्र आणि वक्तृत्व स्पर्धा झाल्या.
फोटोग्राफीला दाद
महोत्सवाच्या सुरुवातीपासून शेवटच्या दिवसापर्यंत फोटो काढून त्यातील निवडक पंधरा फोटो स्पर्धकांनी बुधवारी सायंकाळी संयोजकांकडे सोपविले. त्याचे परीक्षण झाले असून उद्या सर्व स्पर्धेचा निकाल कळेल व समारोप समारंभात पारितोषिके वितरण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.